सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमीलन व फराळ वाटप कार्यक्रमास शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात वाडीवस्त्यांमध्ये दीपावली स्नेहमीलन व फराळ वाटप करण्यात आले.
आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते शहरातील इंदिरा नगर, एकता नगर, रजाळवाडी, आरके वाडी, गणेश कॉलनी, वाघ वस्ती, सपकाळ वाडी, माऊली नगर, पंडित वाडी, म्हसोबा गल्ली, गणेश कॉलनी, पाबळवाडी, खोडकाई वाडी, चर्च परिसर, दुर्गा नगर अशा विविध
भागात फराळ वाटप करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी झालेल्या दीपावली स्नेहमीलन कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांना दीपावली, पाडवा, भाऊबीज निमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, कृउबा समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, विठठल सपकाळ, शंकरराव खांडवे, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, सत्तार हुसेन, सुधाकर पाटील, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, मनोज झंवर, आसेफ बागवान, रउफ बागवान, राजेंद्र ठोंबरे, शिवा टोम्पे, बबलू पठाण, आदींची उपस्थिती होती.














